Team India Test Squad Against South africa  saam tv
Sports

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

India vs SA Squad Announced : दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिलकडं नेतृत्व असेल. तर दोन मोठ्या संकटांवर मात करून ऋषभ पंत संघात परतला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडं मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

  • भारतीय कसोटी संघाची घोषणा

  • विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री

  • दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून

India vs South Africa Test Sqaud : वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयनं टीम इंडियाची घोषणा करताना स्टार फलंदाज-विकेटकीपर ऋषभ पंतला संघात स्थान दिलं आहे. इतकंच नाही तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर दिली आहे. तर दोन जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

एन जगदीशन आऊट, ऋषभ इन!

भारतीय संघानं अखेरची कसोटी मालिका वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत भारतीय संघानं दर्जेदार कामगिरी केली होती. आता दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात दोन बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंत हा इंग्लंड मालिकेदरम्यान जखमी झाला होता. त्यामुळं संघातून बाहेर झाला होता. त्यावेळी ध्रुव जुरेल याच्याकडं यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली होती. बॅकअप विकेटकीपर म्हणून एन जगदीशनला संघात संधी दिली होती. आता ऋषभच्या पुनरागमनामुळं जगदीशनला संधी दिली नाही. विकेटकीपिंगसाठी पहिली पसंती ऋषभ पंतला असणार आहे. तर ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

प्रसिद्ध कृष्णा बाहेर, आकाशदीपचं कमबॅक

भारतीय संघाच्या गोलंदाजीत आणखी एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान दिलेलं नाही. त्याच्या जागी आकाश दीपला संधी दिली आहे. प्रसिद्ध कृष्णा भारत अ संघात खेळणार आहे. हे दोन बदल वगळता वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणारा संघ कायम आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सलामीला मैदानात उतरतील. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या खांद्यावर असणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचं वेळापत्रक

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळवण्यात येईल. या मालिकेतील सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनुसार होतील. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्व आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून पॉइंट्स पर्सेंटेज वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार-विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT