Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच वगळलं, आयसीसीनं वर्ल्ड बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

ICC Womens World Cup Best Playing 11 : महिला वर्ल्डकप २०२५ ची सर्वोत्कृष्ट प्लेइंग ११ जाहीर करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या हरमनप्रीत कौरला संघातून वगळण्यात आलं आहे.
Harmanpreet Kaur And smriti mandhana
Harmanpreet Kaur And smriti mandhanasaam tv
Published On
Summary
  • महिला क्रिकेट वर्ल्डकपनंतर आयसीसीची मोठी घोषणा

  • वर्ल्डकप २०२५ मधील बेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर

  • विश्वविजेत्या संघाची कर्णधार हरमनप्रीतला डच्चू

  • कर्णधारपद तर सोडाच, संघातूनच वगळलं

Womens World Cup 2025 Best Playing 11 : भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्डकप २०२५ जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हा इतिहास घडवला. पण जिच्या नेतृत्वात भारतानं वर्ल्डकप जिंकला, त्या हरमनप्रीतला आयसीसीच्या सर्वोत्तम संघाचं कर्णधारपद सोडाच, पण त्या संघात स्थानही दिलं नाही.

आयसीसीनं मंगळवारी महिला वर्ल्डकप २०२५ ची प्लेइंग इलेव्हन घोषित केली. या संघात भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या हरमनप्रीतला स्थान दिलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फायनलमध्ये भारतानं पराभूत केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वुलवार्टकडे या संघाचं नेतृत्व दिलं आहे. लॉरानं वर्ल्डकप फायनलमध्ये शतकी खेळी केली होती.

भारताच्या तीन खेळाडूंना संधी

आयसीसी महिला वर्ल्डकपच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यात सलामीवीर स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेली दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. तर वर्ल्डकप फायनलमध्ये भारताकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील तीन खेळाडूंनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. कर्णधार लॉरा वुलवार्टसह नादीन डी क्लार्क आणि मारिजेन कॅप यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंवर विश्वास

ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर आयसीसीनं विश्वास दाखवला आहे. त्यांना बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. ऑलराउंडर अॅश गार्डनर, एनाबेल सदरलँड आणि फिरकीपटू एलाना किंग यांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन, पाकिस्तानची एकमेव खेळाडू विकेटकीपर सिदरा नवाझ हिला प्लेइंग ११ मध्ये घेतलं आहे. सिदरानं चार झेल आणि ४ स्टम्प केले होते. त्यामुळं तिला संघात संधी दिली आहे. धक्कादायक म्हणजे बेस्ट फिनिशर असलेली ऋचा घोष हिला संधी दिलेली नाही.

हरमनप्रीतला संघात का स्थान नाही?

आयसीसीनं महिला वर्ल्डकपच्या बेस्ट प्लेइंग ११ मध्ये हरमनप्रीतला संधी न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तिनं भारतीय संघाचं नेतृत्व उत्कृष्ट पद्धतीनं केलं. पण फलंदाज म्हणून तिची कामगिरी सर्वोत्तम होऊ शकली नाही. महिला वर्ल्डकप स्पर्धेत हरमनप्रीतनं ८ डावांमध्ये ३२.५० च्या सरासरीनं अवघ्या २६० धावा केल्या. या स्पर्धेत तिनं दोन अर्धशतके ठोकली. दुसरीकडं ऋचा घोष हिनं ८ डावांमध्ये १३३ हून अधिकच्या स्ट्राइक रेटने २३५ धावा कुटल्या. याशिवाय फिल्डिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली. तिनं चार कॅच पकडल्या आहेत. मात्र, तरीही तिला बेस्ट प्लेइंग ११ मध्ये फिनिशर म्हणून संधी देण्यात आली नाही.

Harmanpreet Kaur And smriti mandhana
Women's World Cup 2025: भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स; हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास

बेस्ट प्लेइंग ११ मध्ये निवडलेल्या खेळाडूंची महिला वर्ल्डकपमधील कामगिरी

स्मृती मंधाना

४३४ धावा

५४.२५ ची सरासरी

एक शतक आणि दोन अर्धशतके

लॉरा वुलवॉर्ट

५७१ धावा, ७१.३७ ची सरासरी

दोन शतके, तीन अर्धशतके

जेमिमा रॉड्रिग्ज

२९२ धावा

५८.४० सरासरी

एक शतक, एक अर्धशतक

मॅरिजेन कॅप -

२०८ धावा

२९.७१ सरासरी

दोन अर्धशतके

१२ विकेट्स, २०.२५ सरासरी

अॅश गार्डनर -

३२८ धावा

८२ ची सरासरी

एक शतक

दोन अर्धशतके

७ विकेट्स

दीप्ती शर्मा

२१५ धावा

३०.७१ सरासरी

एक शतक

तीन अर्धशतके

२२ विकेट्स

एनाबेल सदरलँड

११७ धावा

२९.२५ सरासरी

एक अर्धशतक

१७ विकेट्स

नादीन डी क्लार्क

२०८ धावा

५२ सरासरी

एक अर्धशतक

९ विकेट्स

सिदरा नवाझ

८ विकेट्स (चार कॅच, चार स्टम्प)

६२ धावा

२०.६६ सरासरी

एलाना किंग

१३ विकेट्स, १७.३८ सरासरी

सोफी एक्लेस्टोन

१६ विकेट्स,

१४.२५ सरासरी

Harmanpreet Kaur And smriti mandhana
World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com