team india t20 world cup 2024 squad mohammed siraj and arshdeep singh not performed well in ipl 2024 amd2000 saam tv
Sports

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडीजमध्ये होणार असल्याने भारतीय संघात ४ फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तर केवळ ३ वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र या वेगवान गोलंदाजांची निवड करुन बीसीसीआयने चूक केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सिराज- अर्शदीपची निवड करुन बीसीसीआयने चूक केली?

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेलल्या संघात जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांनाही आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. या दोघांची निवड आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नव्हे तर, गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. ही जोडी सुरुवातीच्या षटकांमध्य शानदार गोलंदाजी करुन संघाला चांगली सुरुवात मिळवून देऊ शकते.

या गोलंदाजांना बीसीसीआयने केलेलं इग्नोर...

या स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजला प्रमुख संघात स्थान दिलं गेलं आहे. तर खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर संदीप शर्मा आणि टी नटराजन यांना पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं आहे.

संदीप शर्माने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. तर टी नटराजनने देखील इकोनॉमीकल गोलंदाजी केली आहे. तर मोहम्मद सिराजच्या आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९.५० च्या इकोनॉमीने धावा केल्या आहे. तर अर्शदीप सिंगने ९ पेक्षा अधिकच्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT