आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अगदी काही दिवसच शिल्लक उरले आहेत. यंदाच्या विश्वचषक आपल्याच देशात यावा यासाठी टीम इंडियासह अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची चाचपणी सुरू केली आहे. वर्ल्डकपसाठी जवळपाच सर्वच संघांनी आपल्या १५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र, असं असलं तरी या यादीत २८ सप्टेंबरपर्यंत बदल करता येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे वर्ल्डकप संघात निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूवर निवड समितीचं लक्ष आहे. अशातच टीम इंडियाचा मिस्टर ३६० आणि टी २० स्पेशालिस्ट बॅट्समन सूर्यकुमार यादव याचा वर्ल्डकप संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या काही वनडे सामन्यात सूर्यकुमारला चांगली कामगिरी करता आलेली नाही.(Latest Marathi News)
आयपीएलमधील विस्फोटक खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने टीम इंडियाकडून (Team India) आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. अत्यंत कमी कालावधीत त्याने टी-२० मध्ये आपली छाप पाडली. याच कामगिरीमुळे सूर्यकुमारला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही संधी देण्यात आली होती.
मात्र, सूर्याला वनडेत आपला जलवा दाखवता आला नाही. मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यात सूर्यकुमारला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे त्याच्या वनडे क्रिकेटवर अनेकांनी बोट ठेवलं होतं. मात्र, असं असून देखील निवड समितीने सूर्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन संधी दिली.
पण सूर्या निवड समितीच्या आशांवर खरा ठरला नाही. आशिया चषक स्पर्धेतही सूर्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, आता टीम इंडिया वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका सूर्यासाठी वर्ल्ड कपआधीची अग्निपरीक्षा असणार आहे. सूर्याने या मालिकेत चांगली कामगिरी न केल्यास त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.