भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान सामना होत आहे. या सामनादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल संघाबाहेर गेला आहे. गिल दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर गेल्याचं समोर आलं आहे. टी२० वर्ल्डकपच्या दोन महिन्याआधी हा धक्का बसल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
दुखापतग्रस्त असतानाही गिल सीरीज खेळण्यासाठी आला होता. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात कोलकातामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात गिल दुखापतग्रस्त झाला होता. या सामनादरम्यान त्याच्या गळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गिल टेस्ट आणि वनडे सीरीजमधूनही बाहेर गेला होता. खरंतर गिलला टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर सीरीजमधील संघात स्थान दिलं होतं. मात्र, एका महिन्यांनी गिल पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे.
टी२० वर्ल्डकपसाठी अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यातच संघाच्या स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. टी२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला फक्त ६ टी२० सामने खेळायला मिळणार आहे. काही सामन्यात त्याची खराब कामगिरी पाहायला मिळाली. या वर्षी गिलने एकाही टी२० सामन्यात अर्धशतक पूर्ण केलेलं नाही.
शुभमनच्या खराब कामगिरीमुळे प्लेइंग इलेवनमधून बाहेर ठेवून संजू सॅमसन देण्याची मागणी करण्यात येत होती. दुसरीकडे अक्षर पटेल आजारी पडल्याने आधीच मालिकेतून बाहेर गेला आहे.
टीम इंडियाला नेमका कोणता धक्का बसलाय?
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.
शुभमनला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात त्याच्या गळ्याला दुखापत झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.