भारताच्या वाघिणींनी इतिहास रचलाय... सात वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवून टीम इंडियाच्या महिलांनी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय...ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 339 धावंचं मोठं आव्हानं उभं केलं...मात्र भारतीय संघाच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद 127 धावांच्या तडाखेबाज फलंदाजीनं भारताला थेट फायनलचं तिकीट मिळवून दिलं. तिला कॅप्टन हरमनप्रीत कौरनं 89 धावांची जबरदस्त साथ मिळाली. दोघांनीही सिंगल-डबल्ससह जबरदस्त चौकारांची आतषबाजी केली.
यापूर्वी 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सेमीफायनलमध्येच ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केले होते. मात्र भारताच्या वाघिणींनी नेत्रदीपक कामगिरीमुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आठव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं.विशेष म्हणजे महिला क्रिकेटमधला हा आतापर्यंतचा विश्वविक्रमी धावांचा पाठलाग ठरला. आता फायनलमध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वविजेतेपदानं हुलकावणी दिलीय. त्यामुळे दोघांसाठी करो या मरोचा जोश असणार आहे. त्यामुळे 2 नोव्हेंबरच्या सामन्यात कोण इतिहास रचणार याकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.