ind vs aus yandex
Sports

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही; बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत टीम इंडिया या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Team India Playing XI for Border Gavskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी कशी असेल भारताची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Team India Playing XI For IND vs AUS Series: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरुवात होईल.

दोन्ही संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. भारतीय संघाने गेल्या दोन मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पराभूत केलंय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाची परतफेड करण्याचा विचारत असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. भारताने गेल्या २ मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदाही भारताला ही मालिका जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान या मालिकेत भारतीय संघ कोणत्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार? जाणून घ्या.

अशी असेल सलामी जोडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे डावाची सुरुवात करताना दिसतील. दोघेही आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यामुळे दोघांकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.

मध्यक्रम

या सामन्यात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. यापूर्वी ही जबाबदारी चेतेश्वर पुजाराकडे होती. मात्र आता गिल ही जबाबदारी पार पाडताना दिसेल. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आणि रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल.

सहाव्या क्रमांकावर कोण खेळणार?

या सामन्यात सहाव्या क्रमांकावर सरफराज खान किंवा केएल राहुलपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

अष्टपैलू खेळाडू

या सामन्यासाठी रविंद्र जडेजा किंवा आर अश्विनपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. कारण ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तर फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले जाऊ शकते. सुंदर फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

वेगवान गोलंदाज

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आकाशदीप आणि मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT