mukesh-kumar-wife-dance-video twitter
Sports

Viral Video: एकदम झक्कास! 'लगावेलू जब लिपिस्टिक'वर मुकेश कुमारच्या पत्नीचा भन्नाट डान्स; Video होतोय व्हायरल

Mukesh Kumar Wedding Viral Video: या विवाह सोहळ्यात मुकेश कुमार आणि दिव्याने भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Mukesh Kumar Wife Dance:

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. तो दिव्या सिंगसोबत विवाह बंधनात अडकला आहे. दरम्यान या विवाह सोहळ्यात मुकेश कुमार आणि दिव्याने भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारत -ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना सुरु होण्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने मुकेश कुमार खेळणार नसल्याची माहिती दिली.त्यावेळी त्याने सांगितलं की, तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी मॅच खेळायला गेलाय. मैदानात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या या गोलंदाजाने आपल्या लग्नमंडपात आपल्या डान्सने धुमाकूळ घातला आहे. (Latest sports updates)

सोशल मीडियावर मुकेश कुमारच्या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय, ज्यात मुकेश आपल्या पत्तीसह डान्स करताना दिसून येत आहे. दोघांनी प्रसिद्ध भोजपूरी गीत लगावेलू जब लिपिस्टिकवर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

मुकेश कुमारचा विवाह सोहळा गोरखपुरमधील एका हॉटेलमध्ये पार पडला. त्याच्या पत्नीचं नाव दिव्या सिंग असं आहे. मुकेशच्या विवाह सोहळ्यात त्याचे मित्रही धम्माल मस्ती करताना दिसून आले आहेत.

तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत २-१ ने दमदार कमबॅक केलं आहे. भारतीय संघाने दिलेल्या २२३ धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक १०४ धावांची तुफानी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली तर, झटपट बनवा खमंग मूग डाळ हलवा

Hair Fall: केस गळताहेत? तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नापणे धबधब्यावर लोकार्पण

Nanded News: स्मशानभूमीच्या वादावरून दोन गावचे गावकरी भिडले, अंत्ययात्राच थांबवली|VIDEO

SCROLL FOR NEXT