shreyas iyer
shreyas iyersaam tv news

Team India News: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं टेन्शन वाढलं! अय्यरचं कमबॅक होताच फॉर्ममध्ये असूनही बसावं लागेल बाहेर

Shreyas Iyer Comeback: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर कमबॅक करताना दिसून येणार आहे.
Published on

Tilak Verma T20 World Cup 2024:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.

मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील युवा शिलेदार यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग आणि इशान किशन यांनी दमदार खेळ केला आहे. तर दुसरीकडे तिलक वर्माला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

तिलका वर्मा होणार बाहेर?

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघाची ही पहिलीच टी-२० मालिका आहे. आता भारतीय संघाचं संपुर्ण लक्ष वेस्टइंडिज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे.

या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला केवळ ९ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या २ सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून कमबॅक करणार आहे. त्याचं संघात कमबॅक झाल्यानंतर तिलक वर्माला संधी मिळणं कठीण आहे.

shreyas iyer
IND vs AUS, Playing XI: ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार की टीम इंडिया मालिका जिंकणार? पाहा संभाव्य प्लेइंग ११ अन् पिच रिपोर्ट

टॉप ऑर्डरची दमदार कामगिरी..

तिलक वर्मा फ्लॉप ठरला असला तरीदेखील संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला आहे. सलामीला येणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांनी दुसऱ्या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती.

त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या रिंकू सिंगने देखील शेवटी येऊन तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने वर्ल्डकप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी दावेदारी सादर केली आहे. (Latest sports updates)

shreyas iyer
IND vs AUS Weather: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

तिलक वर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना त्याने १० चेंडूंचा सामना करत १२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या टी -२० सामन्यात त्याला जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार मारला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com