team india squad selection for t20 world cup 2024 know the latest updates here amd2000 google
Sports

T20 World Cup 2024: टीम इंडियाबाबत मोठी बातमी! हार्दिक पंड्याऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी

Team India Selection For T20 World Cup 2024: आज भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान या संघात कोणाला संधी मिळू शकते जाणून घ्या.

Ankush Dhavre

टी- २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. ही बैठक होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यात बैठक झाली होती. तब्बल २ तास चाललेल्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान लवकरच भारतीय संघात स्थान मिळवलेल्या १५ खेळाडूंची नावं समोर येतील.

कोणाला मिळणार संधी?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आज (३० एप्रिल) भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, संजू सॅमसन आणि केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशी चर्चा सुरु आहे की,यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतला पहिली पसंती दिली जाऊ शकते. त्यामुळे संजू सॅमसन आणि केएल राहुलला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे.

या खेळाडूंना मिळणार संधी?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यावेळी युजवेंद्र चहलचं टी-२० वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न स्वप्नचं राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नेहमीप्रमाणे यंदाही त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. मात्र यावेळीही त्याला भारतीय संघात स्थान दिलं जाणार नाही. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शानदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेला भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासह खलील अहमद, रियान पराग, अक्षर पटेल आणि शुभमन गिल हे राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत वेस्टइंडीजला रवाना होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा असू शकतो भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT