indian cricket team yandex
Sports

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी आज होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! कर्णधारासह संपूर्ण संघात होणार बदल

Team India Squad For IND vs SL Series: भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

Ankush Dhavre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला. या दौऱ्यासाठी आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. तर संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी आज (१७ जून) भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २७ जूनपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भारतीय संघाला टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माची रिप्लेसमेंट मिळणार आहे.

ज्यावेळी रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली, त्यावेळी असं म्हटलं जात होतं की, हार्दिक पंड्या भावी कर्णधार होणार. मात्र आता सूर्यकुमार यादवच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. असं म्हटलं जात आहे की, गौतम गंभीर आणि अजित आगरकरला सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार म्हणून हवा आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हार्दिक पंड्या टी-२० मालिका खेळताना दिसेल. मात्र तो कर्णधार म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता खूप कमी आहे. दरम्यान त्याने वनडे मालिकेतून माघार घेतली असल्याची चर्चा सुरु आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारताचा टी-२० संघ:

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारताचा वनडे संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT