usa cricket team saam tv news
Sports

IND vs USA: अमेरिकेला हलक्यात घेऊन चालणार नाही; टीम इंडियाला या ५ खेळाडूंपासून राहावं लागेल सावध

India vs USA, Players To Watch Out: न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील २५ व्या सामन्यात भारतीय संघाचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडिमयवर रंगणार आहे. भारतीय संघातील खेळाडू तुफान फॉर्ममध्ये असले, तरीदेखील अमेरिकेला हलक्यात घेऊन चालणार नाही. या संघातील काही खेळाडू असे आहेत जे कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतात. दरम्यान कोणते आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

मोनांक पटेल

अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने ३८ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे त्याच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडली असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोनांक पटेलपासून सावध राहावं लागणार आहे.

आरोन जोन्स

आरोन जोन्स हा अमेरिका संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ४० चेंडूंचा सामना करत ९४ धावांची वादळी खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने ३६ धावा चोपल्या होत्या. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, भारतीय संघाला त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे.

नोशतुश केंजिगे

नोशतुश केंजिगेने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटकात ३० धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज सरस ठरतात. त्यामुळे भारतीय संघाला या गोलंदाजांकडूनही सावध राहावं लागणार आहे.

सौरभ नेत्रावळकर

डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने टी-२० वर्ल्डकपमध्ये धुमाकुळ घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली होती. या गोलंदाजीच्या बळावर त्याने अमेरिकेच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

कोरी अँडरसन

कोरी अँडरसन हा अमेरिका संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला न्यूझीलंडकडून वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६३४ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजीत १६ गडी देखील बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Politics: शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर...,शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला सज्जड दम? VIDEO

Maharashtra Live News Update: कोंढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Dhule Crime News : धुळ्यात रक्तरंजित थरार! महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या, परिसरात खळबळ

Ration Card Online: घरबसल्या बनवा रेशन कार्ड! मोबाईल अ‍ॅपवरच होईल पूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT