Tanushree Dutta: "आशिक बनाया आपने" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. तनुश्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिने सातत्याने बॉलिवूडबद्दल स्पष्ट विधाने केली आहेत. दरम्यान, तनुश्रीने पुन्हा एकदा बॉलिवूडबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने बॉलिवूड माफियांवर आपला राग व्यक्त केला आहे.
आमच्या फार्महाऊसला न येता तू हिरोईन कशी बनलीस?
तनुश्री दत्ताने अलीकडेच बॉलिवूड ठिकानाला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान तनुश्रीने इंडस्ट्रीबद्दल अनेक गुपिते उघड केली. मुलाखतीत तनुश्री म्हणाली, "आमचे पाय न चाटता तू सेक्स कसा केलास? आमच्या फार्महाऊसला न भेटता तू हिरोईन कशी बनलीस? तुला बॉलिवूडमध्ये हिरोईनचा दर्जा कसा मिळाला? आमच्या शिफारशीशिवाय तू हिरोईन कशी बनलीस? त्यांच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात. ते लोक हे यश सहन करू शकत नाहीत. त्यांचा आत्मा आतून जळतो."
त्यांना आमच्या आणि सुशांतच्या यशाचा हेवा वाटत होता
तनुश्री दत्ता पुढे म्हणाली, "जर तुम्हाला इतके जेलस वाटत असेल तर व्हा जेलस. आमच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या यशाचा तुम्हाला इतका द्वेष झाला. पण, आता अशी वेळ आहे की हे सर्व बॉलिवूड माफिया आता काही कामाचे राहणार नाहीत कारण प्रेक्षक आता ठरवतं कोणी काम केलं पाहीजे आणि कोणी नाही.
तनुश्री दत्ताचा वर्कफ्रंट
तनुश्री दत्ताची फिल्मी करियरबद्दल बोलायचे झाले तर, तिने इमरान हाश्मीसोबत "आशिक बनाया आपने" (२००५) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने "३६ चायना टाउन," "भागम भाग," "रिस्क" आणि इतर चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती शेवटची २०१३ मध्ये आलेल्या "सुपर कॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन" या चित्रपटात दिसली होती. शिवाय, तनुश्री #MeToo चळवळीमुळे चर्चेत आहे. तिने नाना पाटेकरांवर अनेक गंभीर आरोप केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.