Team India set for major changes after IPL 2026 with new players likely to get opportunities. saam tv
Sports

IPLनंतर टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल; ५ नव्या खेळाडूंची होणार एंट्री, दिग्गजांना मिळणार डच्चू?

Team India : आयपीएल २०२६ नंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे वृत्त आहे.

Bharat Jadhav

  • आयपीएलनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल अपेक्षित

  • ५ नवीन खेळाडूंना मिळू शकते संधी

  • अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत नव्या चेहऱ्यांना संधी

आयपीएल २०२६ नंतर भारतीय संघ एका नवीन सुरुवात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघ भिडणार आहेत. हे दोन्ही संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. वृत्तानुसार या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांच्यासह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने देखील शानदार कामगिरी केली आहे. त्याने देशांर्गत सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील काही सामन्यांपासून तो सलग विकेट घेत आहे. यासह उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा करतोय. निवडकर्त्यांची नजर त्याच्यावर असून त्याला संघात घेतील अशी शक्यता आहे. जर रवींद्र जडेजाला आराम देण्यात आला तर सुथारला संघात संधी मिळू शकते.

हर्ष दुबे देखील प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करत आहे. त्याने २७ सामन्यांमध्ये १३३ बळी घेतले आहेत. त्या खेळीमुळे निवड समितीचं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे. सध्या त्याने एसआरएच (SRH) संघाकडून ५ सामन्यांमध्ये ५ बळी घेतले आहेत. जर त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली, तर त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात संधी मिळू शकते.

आरसीबीचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही भरपूर धावा केल्या आहेत. टाइम्सच्या वृत्तानुसार, निवड समिती त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यालाही संधी मिळू शकते.

अकीब नबीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक बळी त्याने आपली छाप पाडली आहे. याच कारणामुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याला ८.४० कोटी रुपये खर्च करून संघात घेतले आहे. सध्या अकीब निवड समितीच्या नजरेत आहे. जर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली गेली, तर नबी अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT