Team India Saam Tv
Sports

Team India: रवींद्र जडेजा T20 मालिकेतही राहू शकतो बाहेर! फिटनेसमुळे वाढले टीम इंडियाचे टेन्शन

टीम इंडियाने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका ३-० ने जिंकली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: टीम इंडियाने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका ३-० ने जिंकली. या मालिकेत भारताने (Team India) चांगली कामगिरी केली. पण काही खेळाडूंच्या फिटनेसमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. रवींद्र जडेजाही फिट नाही. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा होती मात्र तो मैदानात उतरू शकला नाही. जडेजाला का खेळू शकला नाही, याचे बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

रवींद्र जडेजा अजूनही १०० टक्के तंदुरुस्त नसल्याने तो खेळू शकलेला नाही, असं बीसीसीआयने (BCCI) सांगितले आहे. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेत निवडीसाठी नव्हता. तो सध्या उपचार घेत आहे. जडेजाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमुळे २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतूनही तो बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआयला (BCCI) जडेजाच्या पुनरागमनाची गडबड करायची नाही. टीम इंडियाला ऑगस्टमध्ये आशियाई कप खेळायचा आहे. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे.

यामुळे बीसीसीआय (BCCI) जडेजाबाबत कोणताही गडबडीत निर्णय घेणार नाही. जडेजाला सध्या सराव न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण यामुळे त्याच्या गुडघ्याची दुखापत वाढण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी जडेजाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पहिले दोन वनडे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्ण देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

SCROLL FOR NEXT