team india saam tv
क्रीडा

Team India Playing 11 : ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लॅन! या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात; रोहितचा जिगरी संघाबाहेर

WTC Final: अंतिम सामन्यासाठी कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११, जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs Australia WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये येत्या ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ होणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

भारतीय संघ गेल्या १० वर्षांपासून आयसीसीची ट्रॉफी मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. यावेळी रोहित शर्मावर ट्रॉफी जिंकवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान अंतिम सामन्यासाठी कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११, जाणून घ्या.

सलामीवीर फलंदाज..

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. या दोघांवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा अजूनही आपल्या फॉर्मच्या शोधात आहे.

तर दुसरीकडे शुभमन गिल जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेत ८९० धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. त्यामुळे हे दोघेच डावाची सुरुवात करणार यात काहीच शंका नाही.

मिडल ऑर्डर..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या या महत्वाच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला येऊ शकतो. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. श्रेयस अय्यर बाहेर झाल्यामुळे अजिंक्य रहाणेला कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे.

तो या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. अजिंक्य रहाणेची बॅट इंग्लंडमध्ये चांगलीच तळपते. त्याला २०१४, २०१८ आणि २०२१ इंग्लंड दौरा खेळण्याचा अनुभव आहे. (Latest sports updates)

लोअर मिडल ऑर्डर..

या सामन्यात सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला संधी दिली जाऊ शकते. तो आक्रमक फलंदाजी करून धावसंख्येत भर घालू शकतो. तर फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी सातव्या क्रमांकावर ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. ईशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून या संघात स्थान दिलं जाऊ शकतं. कारण केएस भरत हवी तशी कामगिरी करू शकला नाहीये.

फिरकी गोलंदाज..

या सामन्यासाठी एकमात्र फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. अश्विनला रविंद्र जडेजाची साथ मिळाली तर हे दोघे ऑस्ट्रेलियाची चिंता वाढू शकते.

वेगवान गोलंदाज..

वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादवला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि अक्षर पटेलला बाहेर बसावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT