India vs paksitan saam tv
Sports

Team India Playing 11: पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी टीम इंडिया या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Team India Playiing XI For IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११ जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळत असते. दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावूने देतात. मात्र जिंकतो, तोच संघ जो प्रेशरमध्ये चांगला खेळ करतो. पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ६ वेळेस भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर पाकिस्तानला केवळ १ विजय मिळवता आला आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीत यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर येऊ शकते. रोहित एकदा सेट झाला, तर तो कुठलंही गोलंदाजी आक्रमण फोडून काढू शकतो. ही जोडी जर टिकली, तर पाकिस्तानच्या गोलंदाजांची खैर राहणार नाही.

भारतीय संघाकडून विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार फलंदाजी करत त्याने ७४१ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपवर नाव कोरलं आहे. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर येऊ शकतो. सध्या तो टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. तो शेवटच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारुन देऊ शकतो.

भारतीय संघाचं फलंदाजी आक्रमण आणखी मजबूत झालं आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. रिषभ पंतही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाला संधी दिली जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT