team india saam tv
क्रीडा

IND vs WI Playing 11: पहिल्या वनडेत रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; पाहा संभावित प्लेइंग 11

IND vs WI 1st ODI: जाणून घ्या कशी असू शकते या सामन्यासाठी भारत आणि वेस्टइंडीज संघाची प्लेइंग ११.

Ankush Dhavre

IND vs WI 1st ODI Team India Playing 11: भारतीय संघाने कसोटी मालिकेत वेस्टइंडीज संघावर १-० ने विजय मिळवला. आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७ जुलै रोजी बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते या सामन्यासाठी भारत आणि वेस्टइंडीज संघाची प्लेइंग ११.

कोण करेल डावाची सुरुवात?

कसोटी मालिकेत रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून आला होता. आता वनडे मालिकेसाठी यशस्वी जयस्वालसह शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड देखील शर्यतीत आहेत.

तसेच ईशान किशनचा (Ishan Kishan) पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. आता रोहित कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ईशान किशन की संजू सॅमसन? कोणाला मिळणार संधी?

पहिल्या वनडेत यष्टिरक्षकाची भूमिका कोण पार पाडणार? या प्रश्नाने नक्कीच रोहितची चिंता वाढवली असेल. ईशान किशनला कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

या संधीचा फायदा घेत त्याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तर संजू सॅमसनने आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

पहिल्या वनडेसाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11):

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर/मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

पहिल्या वनडेसाठी अशी असु शकते वेस्टइंडीज संघाची प्लेइंग ११ (West Indies Playing 11):

ब्रँडन किंग, कीसी कार्टी, शिमरोन हेटमायर, शाई होप, एलिक एथिनेज, काइल मेयर्स, रोमारियो शेफर्ड, अल्जारी जोसेफ, जेडन सील्स, केविन सिंक्लेयर, ओशेने थॉमस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT