indian cricket team  saam tv
क्रीडा

IND vs PAK, Playing XI : बुमराहच्या कमबॅकनंतर टीम इंडियात होणार २ मोठे बदल; पाकला आव्हान देण्यासाठी अशी असेल प्लेइंग ११

India vs Pakistan, Team India Playing 11 Prediction: पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात २ मोठे बदल होऊ शकतात.

Ankush Dhavre

Team India Playing 11 Prediction, Ind vs Pak Match:

कोलंबोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ चा सामना रंगणार आहे. यापूर्वी साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

मात्र भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर पावसाचं आगमन झाल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.

पाकिस्तानविरूद्ध झालेल्या साखळी फेरीतील सामन्यामध्ये शार्दुल ठाकुरला संघात स्थान दिले गेले होते. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता. आता केएल राहुल परतल्याने पुन्हा एकदा ईशान किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ईशान की राहुल? आणि शमी की शार्दुल? कोणाला संधी द्यायची हा प्रश्न रोहित शर्मासमोर असणार आहे.

कोणाला मिळणार संघात स्थान..

केएल राहुल सुरूवातीच्या २ सामन्यांमधून संघाबाहेर होता. आता त्याचे कमबॅक झाले आहे. मात्र राहुलऐवजी ईशान किशनला संघात स्थान दिले जाऊ शकते. कारण पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात ईशान किशनने ८२ धावांची खेळी केली होती.

गेल्या ४ सामन्यांमध्ये त्याने सलग ४ अर्धशतके झळकावली आहेत. तर केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅक करतोय. भारतीय संघासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात केएल राहुलला खेळवण्याची रिस्क रोहित घेऊ शकत नाही.

नेपाळविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळताना दिसून आला नव्हता.

त्याच्याऐवजी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले गेले होते. आता जसप्रीत बुमराहच्या कमबॅकनंतर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या दोन्ही गोलंदाजांमधून कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या रविंद्र जडेजा,केएल राहुल/ईशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/शार्दुल ठाकुर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT