india vs pakistan asia cup  Twitter/BCCI
Sports

IND vs PAK, Team India Playing 11: महामुकाबल्यातून शमी - सूर्याला डच्चू! रोहितने 'या' खेळाडूंना दिलं स्थान

Team India Playing 11: या सामन्यासाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 Ind vs Pak Team India Playing 11:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेच्या कँडीमध्ये भारत विरूद्ध या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्लेइंग ११ मध्ये काही मोठा बदल करण्यात आला आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळ संघावर २३८ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात संघातील २ प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवलं आहे.

संघातील २ प्रमुख खेळाडू बाहेर..

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं गेलं आहे. तर शार्दूल ठाकूर आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. तसेच फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या खांद्यावर असणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्म (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

अशी आहे पाकिस्तान संघाची प्लेइंग ११ :

फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रउफ आणि नसीम शाह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elections : एकनाथ शिंदेंचा भाजप आणि काँग्रेसला दे धक्का! २ माजी आमदार, २५ नगरसेवक, १०० सरपंचांचा शिवसेना प्रवेश

Ayushman Bharat card: घर बसल्या कसं काढू शकता आयुष्मान भारत कार्ड

Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरेगावी आगमन

BMC Election Explainer : मुंबईत ठाकरेंचीच सरशी? महायुतीचं टेन्शन वाढलं; ७० वॉर्ड निर्णायक, राज ठाकरे किंगमेकर ठरणार?

SCROLL FOR NEXT