team india playing 11  Saam tv news
Sports

IND vs BAN, Playing XI: बांगलादेशला धुळ चारण्यासाठी रोहितचा 'मास्टरप्लान; संघात स्टार खेळाडूला देणार स्थान;पाहा प्लेइंग ११

Team India Playing 11: या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

Ankush Dhavre

IND vs BAN, Playing XI:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला आहे.

आता भारतीय संघाचा पुढील सामना १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरूद्ध रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर येऊ शकते. या सामन्यातही इशान किशनला प्लेइंग ११ मधून बाहेर राहावं लागणार आहे. तर संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळणार संधी..

या सामन्यातही श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. तर संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल.

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. जडेजा या सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीने आणि आक्रमक फलंदाजीने मोलाचं योगदान देऊ शकतो. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी भारतीय संघात कुलदीप यादवसह आर अश्विनला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. कुलदीप यादव आणि आर अश्विन हे दोघेही फिरकी गोलंदाज बांगलादेशविरूद्ध सामन्यात घातक ठरू शकतात.

तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह या दोघांना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं निश्चित आहे. जर आर अश्विनला संघात स्थान दिलं गेलं तर शार्दुल ठाकुरचा पत्ता कट होणं निश्चित आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT