Ind Vs Aus WTC Final 2023 saam tv
Sports

WTC Final नंतर निवृत्ती जाहीर करेल टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू! प्लेइंग-11 मध्येही जागा मिळणे कठीण

Ind Vs Aus WTC Final 2023 : या सामन्यानंतर टीम इंडियाचा एका दिग्गज अनुभवी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jagtap

WTC Final 2023 : टीम इंडिया लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) अंतिम सामना खेळणार आहे. ७ जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final) कसून सराव करत आहे. परंतु या सामन्यानंतर टीम इंडियाचा एका दिग्गज अनुभवी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यासाठी टीम इंडिया कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. डॅशिंग सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma)संघाचं नेतृत्व करणार असून अंतिम सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्याच्या उद्देशान मैदानात उतरेल. परंतु या सामन्याननंतर लगेचच भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसू शकतो.

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन घेणार निवृत्ती?

टीम इंडियाच्या सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) WTC फायनलनंतर लगेचच निवृत्तीची घोषणा करू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. चेन्नईचा हा अनुभवी फिरकीपटू (R Ashwin Update) सप्टेंबरमध्ये 37 वर्षांचा होईल. अशा स्थितीत वाढते वय आणि हळूहळू घसरत चाललेली कामगिरी पाहता तो या आयसीसी ट्रॉफीसोबत निवृत्ती घेऊ शकतो ( Ravichandran Ashwin may announce retirement) असा अंदाज बांधला जात आहे. (WTC Final 2023)

अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात?

अश्विन सध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातून जात आहे. कारण गेल्या काही काळापासून कसोटीशिवाय इतर फॉरमॅटमध्ये त्याला फारशी संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर निवृत्ती जाहीर करू शकतो असे बोलले जात आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियन संघाचे सहाय्यक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनीही अश्विनला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार नाही असा दावा केला होता. (Latest Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT