Ben Stokes Record: कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात जे कोणालाच नाही जमलं, ते स्टोक्सने करून दाखवलं

Ben Stokes Captaincy Record: स्टोक्सने काही कारनामा केला आहे जो १४६ वर्षांच्या इतिहासात कोणालाच करता आला नव्हता.
ben stokes
ben stokes saam tv
Published On

England VS Ireland: आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाचा डबडबड पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंड संघाने जोरदार कामगिरी करून १० गडी राखून विजय मिळवला.

आयर्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाची जादू पाहायला मिळाली. दरम्यान त्याने या सामन्यात असा काही कारनामा केला आहे जो १४६ वर्षांच्या इतिहासात कोणालाच करता आला नव्हता.

ben stokes
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

इंग्लंडचा जोरदार विजय..

इंग्लंड संघाने या सामन्यात जोरदार कामगिरी केली. आयर्लंड संघाचा डाव १७२ धावांवर गुंढाळल्यानंतर इंग्लंडचे फलंदाजी करण्यासाठी आले होते. इंग्लंड संघाने फलंदाजी करताना ५ गडी बाद ५२४ धावा केल्या.

या डावात इंग्लंड संघाकडेन ओली पोपने तुफानी दुहेरी शतकी खेळी केली. तर बेन डकेटने १८२ धावांची खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंड संघाने दुसऱ्या डावात ३६२ धावा केल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ११ धावांची गरज होती. हे आव्हान इंग्लंड संघाने केवळ ४ चेंडूंमध्ये पूर्ण केले. (Latest sports updates)

ben stokes
WTC Final: रोहित शर्माच्या चिंतेत वाढ! WTC च्या अंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंशिवाय उतरावं लागणार मैदानात

स्टोक्सच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

आयर्लंड संघावर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात बेन स्टोक्स हा असा एकमेव कर्णधार ठरला आहे. ज्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टिरक्षण न करता विजय मिळवला आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच कर्णधाराला करता आला नव्हता.

ओली पोपने ठोकलं दुहेरी शतक..

या सामन्यातील पहिल्या डावात ओली पोपने २०८ चेंडूंचा सामना करत २०५ धावांची खेळी केली आहे. यासह त्याने इंग्लंडमध्ये सर्वात जलद दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह खेळीसह त्याने माजी फलंदाज इयाम बोथमचा विक्रम मोडून काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com