Rahul Dravid- VVS Laxman Saam TV
Sports

Team India New Coach : टीम इंडियाला मिळाला नवा मुख्य प्रशिक्षक?, द्रविड-लक्ष्मणच्या अनुपस्थितीत पार पाडणार जबाबदारी

IND vs IRE : लक्ष्मण आयर्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार होते.

प्रविण वाकचौरे

Team India New Coach : भारतीय संघ 15 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होत आहे. मात्र भारतीय संघासोबत या दौऱ्याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळांडूसोबत जाणार नाही. कोचिंग स्टाफचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण देखील संघासोबत जाणार नाही.

 राहुल द्रविड आणि लक्ष्मण या दोन भारतीय दिग्गजांच्या अनुपस्थितीत एनसीएमधील भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक सितांशु कोटक मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडतील, अशी माहिती समोर येत आहे.

लक्ष्मण आयर्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार होता. परंतु लक्ष्मणवर बंगळुरूमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. येथील प्रशिक्षण शिबिर तीन आठवडे चालेल. त्यामुळे लक्ष्मण १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आयर्लंड टी-२० सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.

सितांशु कोटक यांच्यासोबत साईराज बहुतुले हे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार असल्याचेही माहिती मिळत आहे. फक्त T20 सामन्याची ही मालिका असणार आहे. मात्र  जसप्रीत बुमराहचं पुनरागमन आणि कर्णधारपद यासाठी ही मालिका महत्त्वाची राहिली आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान. (Latest sports updates)

टी -२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - १८ ऑगस्ट, मालाहाइड

  • दुसरा सामना - २० ऑगस्ट, मालाहाइड

  • तिसरा सामना -२३ ऑगस्ट, मालाहाइड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT