Rohit Sharma  Saam Tv
Sports

ICC Ranking: टीम इंडियानं करून दाखवलं; 'विराट' विक्रमांचं शिखर केलं सर,तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १

भारतीय संघाने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

Saam TV News

ICC Ranking:सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

भारतीय संघाने (Team India) आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. १५ फेब्रुवारी रोजी ही यादी जाहीर करण्यात आली असून, भारतीय संघ आता तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी आहे. यासह रोहित शर्माच्या नावे देखील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रोहित शर्मा हा जगातील पहिला असा कर्णधार ठरला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ हा तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी आहे. तसेच एकाच वेळी तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल असणारा भारतीय संघ हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. (Latest Sports Updates)

भारतीय संघाने कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे सोडलं आहे. ऑस्टेलियाचे रेटिंग पॉईंट्स १११ आहेत. तर भारतीय संघाने ११५ रेटिंग पॉईंटसह कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर १०६ रेटिंग पॉईंटसह इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी न्यूझीलंड, पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिका,सहाव्या स्थानी वेस्टइंडीज तर सातव्या स्थानी पाकिस्तान संघ आहे.

तसेच आठव्या स्थानी श्रीलंका, नवव्या स्थानी बांगलादेश तर दहाव्या स्थानी झिम्बाब्बे संघ आहे. कसोटी क्रिकेटप्रमाणेच वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या आणि न्यूझीलंड संघ तिसऱ्या स्थानी आहे.

तसेच टी-२० रँकींगमध्ये देखील भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. या यादीत इंग्लंड दुसऱ्या तर पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Times Sign: वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत, वेळीच ओळखा

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा

Skin Care Tips: महिलांनो, रात्री झोपण्यापूर्वी ही चूक तर करत नाही ना? अन्यथा...

Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

SCROLL FOR NEXT