बेंगळुरूमध्ये भारतीय हॉकी संघाच्या डिफेंडर वरुण कुमार विरोधात पॉक्सो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलीय. पीडिता आणि वरुण कुमार या दोघांची इस्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. पीडितेचं वय १७ वर्ष असून तिने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. (Latest News)
पीडिता आणि वरुण कुमार हे २०१९ पासून एकमेकांना ओळखत होते. ओळख झाली तेव्हा वरुण हा वरुण कुमार आणि पीडित मुलगी केवळ १७ वर्षांची असताना SAI येथे प्रशिक्षण घेत होता. वरुण कुमार याने लग्नाच्या बहाण्याने ५ वर्षांत अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वरुण कुमार हा मूळचा हिमाचल प्रदेशचा असून, तो हॉकी सामन्यांसाठी पंजाबला गेला होता. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचा तो भाग होता. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्यपदक विजेत्या संघाचाही तो सदस्य होता.
POCSO, बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणी वरुण कुमारविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. ज्ञानभारती पोलीस जालंधरमध्ये आरोपी वरुणचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.