Rahul Dravid Saam Tv
Sports

Rahul Dravid:'नशीब असावं तर KL Rahul सारखं..' फ्लॉप होऊनही द्रविडने संघाबाहेर करण्यास दिला नकार

हा सामना झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Saam TV News

Rahul Dravid: नुकताच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

यासह ४ सामन्यांच्या मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात केएल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. हा सामना झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.(Latest Sports Updates)

भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. अनेकदा संधी मिळूनही त्याला संधीचं सोनं करता येत नाहीये. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो १७ तर दुसऱ्या डावात केवळ १ धाव करत माघारी परतला.

केएल राहुलची ही फ्लॉप कामगिरी पाहता, संतप्त चाहते त्याला संघाबाहेर करण्याची मागणी करत आहेत. मात्र राहुल द्रविड यांनी त्याला संघात कायम ठेवण्याबाबत भाष्य केले आहे.

राहुल द्रविड यांनी म्हटले की, "आम्ही त्याला पाठिंबा देत राहू. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी स्थिती येत असते. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये जाऊन देखील शतके झळकावली आहेत."

यापूर्वी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी देखील केएल राहुलबाबत भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, "केएल राहुलने गेल्या १० डावांमध्ये काही शतके आणि अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत देखील शतक झळकावले आहे. त्याला खेळवायचं की नाही याचा विचार करायची आम्हाला गरज भासत नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT