IND VS AUS 2nd Test Result: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (Border -Gavaskar Trophy) सुरू आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. (Latest Sports Updates)
या सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोलाचे योगदान देत ३१ धावांची खेळी केली. तर विराट कोहली २० धावा करत माघारी परतला.
त्यानंतर श्रेयस अय्यर १२ धावा करत माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजाराने एक बाजू सांभाळत ३१ धावांची आणि केएस भरतने २३ धावांची अप्रतिम खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. मात्र या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुर गवसला नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली.
तर मार्नस लाबूशेनने ३५ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या फ्लॉप कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी..
भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नतमस्तक होताना दिसून आले होते. या डावात देखील अश्विन आणि जडेजाची जोडी ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडली. या डावात रवींद्र जडेजाने ४२ धावा खर्च करत ७ गडी बाद केले.
तर आर अश्विनने ५९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनने ३ तर जडेजाने देखील ३ गडी बाद केले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.