Virat Kohli
Virat Kohli  saam tv
क्रीडा | IPL

Virat Kohli : निर्णायक सामन्यांमध्ये कोहलीने केला 'विराट' विक्रम, टी-२० इतिहासात ठरला पहिला फलंदाज

नरेश शेंडे

नवी दिल्ली : मागील तीन वर्षांपासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) धावांसाठी संघर्ष करत होता. परंतु, अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात विराटने शतकी खेळी केल्यानंतर तो कमालिचा फॉर्मात आला आहे. ऑस्ट्रेलियात आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी विराट फॉर्ममध्ये आल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. काल रविवारी हैद्राबादमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यातही विराटने चमकदार कामगिरी केली. (Virat kohli makes big record in chasing the target)

विराटने ४८ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकार ठोकून ६३ धावा कुटल्या. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकवून देण्यात विराटचा योगदान बहुमूल्य ठरलं. एव्हढच नाही तर अशी दमदार कामगिरी करणारा विराट टी-२० इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने चेज करताना सर्वात जास्त अर्धशतक ठोकण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

कोहलीने आतापर्यंत १०७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३ अर्धशतक झळकावले आहेत. पण लक्ष्य गाठताना कोहलीने १९ अर्धशतक केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगात एकमेव फलंदाज ठरला आहे. विराटने १४३.७७ च्या सरासरीनं एवढ्या धावांचा पाऊस पाडला आहे. विराट १० इनिंगमध्ये नाबादही राहिला आहे.

परंतु, यामध्ये १९ सामन्यांमध्ये लक्ष्य पूर्ण करताना १५ सामने असे आहेत, ज्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. म्हणजेच टार्गेट गाठताना विराटने १९ पैकी १५ अर्धशतक अशावेळी केले, जेव्हा भारताचा विजय झाला. विशेष म्हणजे चेज करताना विराटची सरासरी २०१.६० एवढी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

Ahmednagar Election Voting LIVE : नीलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क, विरोधकांवर सोडले टीकास्त्र

Weather Forecast: मतदानाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाचा इशारा; जालन्यासह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Akola Crime: संशयित आरोपी मृत्यूप्रकरण: 'त्या' नॉटरेचेबल असलेल्या ५ पोलिसांवरही बदलीची कारवाई

Baramati Crime: संतापजनक! फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला लुटलं; निर्वस्त्र करत केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT