Team India Fan Video Saam tv
क्रीडा

Team India Fan Video : पठ्ठ्याने झाडावर बसून शूट केलेला व्हिडिओ व्हायरल; ओपन बसमधून कोहली-जडेजाने दिली भन्नाट रिअॅक्शन

Vishal Gangurde

मुंबई : टीम इंडियाने टी-२० विश्वषचकानंतर गुरुवारी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत टीम इंडियाला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमींची गर्दी उसळली होती. या विजयरॅलीदरम्यान एक तरुण थेट झाडावर जाऊन बसला होता. या तरुणाने झाडावर बसत टीम इंडियाला जवळून पाहिलं. तसेच या तरुणाने टीम इंडियाला फार जवळून कॅमेऱ्यात कैद केलं. या तरुणाने शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडिया टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर ४ जुलै रोजी भारतात पोहोचली. मुंबईला येण्याआधी टीम इंडियाने अर्धा वेळ दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत घालवला. पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत नाश्ता केला. त्यानंतर मुंबईत टीम इंडियाची पाच वाजता विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी मिरवणुकीत चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या विजयी मिरवणुकीत चाहत्यांनी आवडत्या क्रिकेटपटूंसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

टीम इंडियाच्या विजयी मिरवणूक रॅलीदरम्यान एक तरुण झाडावर जाऊन बसला होता. अवधेश शाह असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने झाडावर बसूनच टीम इंडियाचे फोटो आणि व्हिडिओ काढले. या तरुणाला सर्वात आधी विराट कोहलीने पाहिलं. त्यानंतर विराट कोहलीने रविंद्र जडेजाला सांगितलं. या तरुणाला रोहित शर्माने खाली उतरण्यास सांगितलं. या तरुणाला पाहून विराट कोहलीने खदखदून हसू लागला. या घटनेचा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

झाडावर चढणाऱ्या तरुणासोबत आणखी दोघे-तिघेही झाडावर चढले होते. आवडत्या खेळाडूला पाहता यावं, यासाठी तरुण मंडळी थेट झाडावर जाऊन बसली होती. विजयी मिरवणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग पाहून टीम इंडियाच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह दिसत होता.

रोहित आणि विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने बारबोडासमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती घोषित केली. या दोघांच्या व्यतिरिक्त रविंद्र जडेजानेही टी-२ निवृत्ती घोषित केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT