WTC Final Scenario For Team India saam tv
Sports

WTC Final Scenario: पराभवामुळे टीम इंडियाचं पूर्ण गणित फिस्कटलं, पाहा WTC च्या फायनल गाठण्यासाठी भारतासमोर कसं आहे समीकरण?

WTC Final Scenario For Team India: एडलेट टेस्ट सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबलही पूर्णपणे बदललं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव झाला. टीम इंडियाने या सिरीजमध्ये पहिला सामना जिंकला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाला दुहेरी धक्का बसला. हा धक्का म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेलीये.

एडलेड टेस्ट सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबलही पूर्णपणे बदललं आहे. पर्थमधील पहिली टेस्ट जिंकून नंबर-1 बनलेल्या टीम इंडियाची बादशाहत आता संपुष्टात आलीये.

तर आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दुसरी टेस्ट गमावूनही टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठू शकेल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचं पूर्ण समीकरण जाणून घेऊया.

ॲडलेड टेस्ट गमवाल्यानंतर भारतीय टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. यानंतर टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासोबत 3 सामने शिल्लक राहिलेत. तर समीकरणानुसार, भारताला 3 पैकी 2 सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिफची अंतिम फेरी गाठता येणार आहे. मात्र यावेळी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची बादशाहत संपली

ॲडलेड टेस्टपूर्वी टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 61.11 होती आणि टीम पहिल्या क्रमांकावर होती. मात्र एडलेडमधील पराभवानंतर टीम इंडियाची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. यानंतर आता टीम इंडियाची विजयाची टक्केवारी आता 57.29 झालीये.

याशिवाय ऑस्ट्रेलियन टीम आता तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचलीये. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 57.69 वरून 60.71 झाली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढवल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ५९.२६ विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यास त्यांना पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

SCROLL FOR NEXT