team india
team india  saam tv
क्रीडा | IPL

ICC Test Rankings: सबसे आगे होंगे हिंदुस्तानी! WTC च्या फायनल पूर्वीच ऑस्ट्रेलियाला धोबी पछाड

Ankush Dhavre

WTC Final: आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीयांस संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला आपले नंबर १ स्थान गमवावे लागले आहे. आयसीसीने मंगळवारी कसोटी संघांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने १२१ रेटिंग पॉईंट्ससह पहिले स्थान मिळवले आहे.

तर काही महिन्यांपासून अव्वल स्थानी कायम असलेला ऑस्ट्रेलिया संघ आता दुसऱ्या स्थानी घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉईंट्स ११६ आहे. तर इंग्लंड संघ तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना ७ जून पासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा या सामन्याचे नेतृत्व करताना दिसून येणार आहेत. तर मध्यक्रम आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. तर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी असणार आहे.

या सामान्यासाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय संघ (Team India WTC Final squad) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covaxin लस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी! कोव्हिशील्डसारखेच आहे लशीचे दुष्पपरिणाम, तरुणींवर अधिक परिणाम

Diabetes: मधुमेहांच्या रुग्णांसाठी 'या' भाज्या खाल्ल्यास ठरेल फायदेशीर

Narendra Modi News | मोदींचे कटआऊट हटवले, शिवाजी पार्कात जोरदार राडा

Sambhajinagar News : मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकाचं नुकसान होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT