Shubman Gill confirms Rohit Sharma and Virat Kohli’s inclusion in Team India’s 2027 World Cup plans. saamtv
Sports

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

Captain Gill Big Statement On Rohit And Kohli : टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार शुबमन गिलने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत मोठं विधान केलं. या स्पर्धेसाठी संघात वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश असणार की नाही याचा खुलासा . गिलने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Bharat Jadhav

  • भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलनं स्पष्ट केलं आहे की दोन्ही खेळाडू २०२७ वर्ल्ड कपचा भाग असतील.

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना गिलनं हे विधान केले आहे.

  • रोहित-कोहली यांचा अनुभव संघासाठी अमूल्य असल्याचं गिलनं स्पष्ट केलं.

भारतीय संघाचा एकदिवशीय क्रिकेटचा नवीन कर्णधार शुबमन गिलनं रोहित आणि कोहलीबाबत मोठं विधान केलंय. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाचा पूर्णपणे भाग आहेत. त्यांचा अनुभव, कौशल्य आणि संघातील योगदान दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये खेळणार का नाही, याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. यावरून भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने मोठं विधान केलंय. एकदिवशीय वर्ल्ड कप २०२७ मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळतील. दोन्ही खेळाडू त्या टुर्नामेंटसाठी महत्त्वाचे आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यात येणाऱअया दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी माध्यमांशी बोलताना शुबमन गिलनं हे विधान केलंय. यावेळी बोलताना गिल म्हणाला की, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, त्यांचा अनुभव आणि कौशल्य खूप संघासाठी फायदेशीर ठरेल.

विराट कोहलीनंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. आता संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदार शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. गिलला कर्णधार बनवल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान आता पांढऱ्या रंगाच्या म्हणजेच एकदिवशीय सामन्यांमध्ये रोहित आणि विराट कोहली खेळताना दिसतील का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

रोहित आणि विराट यांचा अनुभव आणि त्यांचे कौशल्य हे खेळाडूंच्या उपयोगी पडते. त्यांनी भारतासाठी अनेक सामने जिंकलेत. त्यांची क्षमता, गुणवत्ता आणि अनुभव संघासाठी खूप मैल्यवान असते. त्यामुळे दोन्ही खेळाडू एकदिवशीय वर्ल्ड कप २०२७ साठी संघाचा भाग असतील. रोहितकडून अनेक गोष्टी शिकलोय. त्यांचा शांत आणि स्वभाव संघात आपलेपणाचा भाव त्याचबरोबर संघात मैत्रीपूर्ण वातावरण कसे ठेवायचं हे गुण रोहितकडून शिकलो आहे, असं गिल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला. तेच माझ्या अंगी यावेत असे प्रयत्न मी करतोय असंही गिल म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Hormones वाढवण्यासाठी खा ही 4 फळे

Shilpa Shetty:शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

SCROLL FOR NEXT