rohit sharma yandex
Sports

Team India News: रोहितच्या अनुपस्थितीत कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? हे आहेत 3 दावेदार

Team India Test Captain: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यात उपलब्ध नसणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान रोहितच्या अनुपस्थितीत कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Border - Gavaskar Trophy: भारतीय संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. बॉर्डर- गावकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.

गेल्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. दरम्यान यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. रोहित शर्मा सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये उपलब्ध राहणार नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान रोहितच्या अनुपस्थितीत कोण होऊ शकतो भारतीय संघाचा कर्णधार? जाणून घ्या.

रिषभ पंत

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहितनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी रिषभ पंतचं नाव आघाडीवर आहे. रिषभकडे एकहाती कसोटी सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. यासह त्याच्याकडे संघाचं नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे.

शुभमन गिल

शुभमन गिलला झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. त्याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे शुभमन गिल हा रोहित शर्माचा पर्याय ठरु शकतो.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्यावेळी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका झाली होती, त्यावेळी भारतीय संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी जसप्रीत बुमराह पार पाडताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT