IND vs WI WTC Points Table: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फायनल सामना गमावल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन जोमाने मैदानात उतरली आहे. टीम इंडियाने नवीन हंगामाची सुरूवात वेस्ट इंडिज दौऱ्याने केली आहे. अशातच डॉमिनिका कसोटीत टीम इंडियाने विंडिजवर एक डाव आणि १४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह भारताने केवळ आपले खातेच उघडले नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिले स्थानही मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारताने नंबर १ स्थानावर कब्जा केला आहे.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केली होती. परंतु तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने १०० टक्के गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणातालिकेत भारताची गुणांची टक्केवारी १०० आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलियाची ६१.११ आणि इंग्लंडची २७.७८ आहे. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अॅशेसमध्ये प्रत्येकी दोन गुण गमावले, ज्यामुळे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवरही परिणाम झाला.
फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला १५० धावांत गुंडाळलं.
त्यानंतर यशस्वी जैस्वाल (१७१ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (१०३) विराट कोहली (७६ धावा) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद ४२१ धावांचा डोंगर उभारला.
टीम इंडियाने भारताने आपल्या पहिल्या डावात २७१ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विंडिजच्या संघाची फिरकीपटू आश्विनच्या माऱ्यासमोर दाणादाण उडाली.
दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ १३० धावांत गारद झाला. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना १ डाव आणि १४१ धावांची जिंकला.
यशस्वी जैस्वाल (१७१ धावा) , रोहित शर्मा (१०३) धावा आणि रविचंद्रन आश्विनने दोन्ही डावात मिळून घेतलेल्या १२ विकेट्समुळे टीम इंडियाने हा सामना आपल्या खिशात टाकला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.