आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू विकतोय चहा; पुरस्कार प्राप्त खेळाडूची शासनाकडून उपेक्षा Saam TV
Sports

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू विकतोय चहा; पुरस्कार प्राप्त खेळाडूची शासनाकडून उपेक्षा

४४ वर्षीय संदीपने तिरंदाज आणि पॉवरलिफ्टर असे दोन खेळात, थायलंड, इटली आणि झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

संजय डाफ

नागपूर : नागपुरातील (Nagpur) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून दिल्यानंतर दिव्यांग तिरंदाज संदीप गवई चहा मिळतोय. संदीप गवई (Rajendra Gawai) यांनी नोकरीसाठी आठ ते दहा वर्षे प्रयत्न केले. मात्र, शासनाकडून नोकरी न मिळाल्यानं अखेर निराश होऊन संदीपनं पोटापाण्यासाठी फूटपाथवर चहाची टपरी टाकलीय. राज्य आणि देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूची (International Player) ही व्यथा आहे. (Nagpur Latest News In Marathi)

४४ वर्षीय संदीपने तिरंदाज आणि पॉवरलिफ्टर असे दोन खेळात, थायलंड, इटली आणि झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक पटकावलं. संदीपच्या या कामगिरीची राज्य शासनाने दखल घेत त्याला प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित केलेय. मात्र, अर्ज करुनंही नोकरी न मिळाल्याने आता त्यांना चाहा विकावा लागतोय. संदीप गवई पूर्वी लग्नात फेटे बांधायचे, मात्र कोरोनामुळे लग्न समारंभावर निर्बंध घातल्याने, त्यांचा व्यवसाय मंदावला, त्यामुळे त्यांना आपलं पोट भरण्यासाठी आता चाहा विकावा लागतोय.

संदीप यांना चहा विक्रीतून दिवसाला शंभर ते दोनशे रुपये मिळतात. त्यात कुटुंबाचा गाडा चालत नाही. सरकारी नोकरी 45 वर्षापर्यंत मिळते. संदीप यांचं वय आता 44 वर्ष आहे. शासकीय नोकरीसाठी त्यांच्याकडे फक्त एक वर्ष उरलंय. त्यामुळं।आतातरी शासनानं नोकरी द्यावी, अशी आर्त हाक संदीप ची आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात रंगली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

SCROLL FOR NEXT