Tanvi Arun Patil Palghar
Tanvi Arun Patil Palghar रुपेश पाटील
क्रीडा | IPL

Tanvi Patil: पालघरची कन्या तन्वी पाटीलची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड; मोठ्या संघर्षांने मिळवलं यश

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: पालघर जिल्ह्यातील निहे या ग्रामीण भागात राहात असलेल्या तन्वी पाटील हिची गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल (Football) संघात निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी तन्वी ही पालघरमधील (Palghar) पहिली खेळाडू ठरली आहे. यामुळे तन्वीवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय. (Palghar Latest News)

पालघर पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील निहे या छोट्याश्या गावातील तन्वी अरुण पाटील (Tanvi Arun Patil) हिची गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याने तिचं सर्वत्र कौतुक होतंय. तसेच तन्वी महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळणारी पालघरमधील पहिली खेळाडू ठरली आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघात तन्वी पाटील प्रतिनिधित्व करणार आहे.

जिद्द, मेहनत, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर तन्वीने आपले ध्येय गाठले आहे. तन्वीने कॉलेज जीवनात एन.सी.सी.मध्ये सहभाग घेऊन 2018 साली दिल्लीमध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये देखील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. आता पुन्हा तन्वीला गुजरातमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार, आई गृहिणी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना देखील तन्वीने जिद्द, मेहनत, महत्वकांक्षा याच्या जोरावर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलंय. पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात तन्वीचं शिक्षण पूर्ण झालं. मागील चार वर्षांपासून तन्वी बोईसरमधील पीडीटीएस या मैदानात फुटबॉलचा सराव करते, तिला या मेहनतीचं फळ मिळालं आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना या खेळाकडे वळून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं अशी अपेक्षा तन्वीने व्यक्त केली आहे. सध्या तन्वी पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना घडविण्यात व्यस्त असून असिस्टंट कोच म्हणून काम पाहत आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यात अडकून न राहता तन्वीने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलंय. तन्वीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागातील इतर तरुण-तरुणींनीही आता फक्त वेळ घालवण्यासाठी खेळू नये, तर या खेळाला संधी म्हणून पाहण्याची गरज आहे .

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT