"तुम्ही काँग्रेस अध्यक्ष होणार का...?" राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv
Published On

कन्याकुमारी: गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गांधी यांनी शुक्रवारी पक्षप्रमुखपदाच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर नसल्याचे संकेत दिले.

काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पत्रकारांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन प्रश्न विचारला यावर राहुल गांधी म्हणाले, "मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे पक्षाच्या निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. "मी निर्णय घेतला आहे. तो घेतला आहे, मी अगदी स्पष्ट आहे, जेव्हा पक्षाच्या निवडणुका होतील तेव्हा मी उत्तर देईन.

Rahul Gandhi
नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोन मराठी नेते मैदानात; भाजपने आखली नवी रणनीती

यावेळी राहुल गांघी यांनी भाजपवर टीका केली. "सर्व संस्था आता भाजपच्या ताब्यात आहेत आणि त्यांचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे." तर दुसरीकडे भाजपने या यात्रेवर टीका केली आहे, काँग्रेसला वाचवण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप केला आहे, या आरोपावर बोलताना राहुल गांधी म्हणाले. "भाजप-आरएसएस त्यांचे मत मांडायला मोकळे आहेत, पण आम्ही ही 'यात्रा' लोकांशी जोडण्यासाठी करत आहोत. ही 'भारत जोडो यात्रा' समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राउंड लेव्हलवर काय चालले आहे. तसेच भाजप-आरएसएसने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

Rahul Gandhi
Anant Chaturdashi: जर्मनी, युरोपच्या झेंड्यांसमोर फडकवला भगवा; परदेशातही धुमधडाक्यात बाप्पाचा विसर्जन सोहळा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे.

काँग्रेस सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पहिल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर (Rahul Gandhi)निशाणा साधला होता. राहुल हे वरिष्ठ नेत्यांना भेटतही नाहीत, असे ते म्हणाले होते. त्यांनी 9 वर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. काँग्रेेस अध्यक्ष पदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com