India Vs South Africa, T20 World Cup  saam tv
Sports

T20 World Cup : फ्लॉप केएल राहुलऐवजी रिषभ पंत सलामीला येणार का? टीम इंडियाचा काय आहे नवा प्लान?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलऐवजी रिषभ पंतला संधी मिळणार का?

Nandkumar Joshi

T20 World Cup, Team India : भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सलग दोन सामने जिंकले आहेत. आता पुढचा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दोन्ही सामन्यांत धावा न करणाऱ्या सलामीवीर केएल राहुल याच्याविषयी महत्वाचे विधान केलं.

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केएल राहुलवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आम्ही सध्या तरी केएल राहुलच्या जागी सलामीला रिषभ पंतला खेळण्याची संधी देणार नाही. राहुलच डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. ११ खेळाडूच संघात खेळू शकतील, असे राठोड म्हणाले. (Cricket News)

रिषभ पंत खूपच प्रभावशाली खेळाडू आहे असं मला वाटतं. तो काय करू शकतो हे आम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी तू कधीही तयार राहायला हवं, असं आम्ही त्याला सांगितलं आहे, असंही राठोड यांनी सांगितलं. (T20 World Cup)

रिषभ पंतने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार राहायला हवं आणि तो सरावातही खूप मेहनत करताना दिसतो आहे. त्याला लवकरच संधी मिळू शकते. त्याला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो तयारच असेल असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय संघ टी २० वर्ल्डकप सुरू होण्याच्या खूप आधीच ऑस्ट्रेलियात पोहोचला होता. संघातील खेळाडूंनी सर्वात आधी पर्थमध्ये जाऊन सराव केला होता. या गोष्टीचा टीम इंडियाला खूपच फायदा होईल. पर्थमधील सामना आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे, असेही राठोड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल

GST Reforms: कारचं स्वप्न होणार पूर्ण, ही मिनी कार तब्बल ३ लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Prithvi Shaw-Sapna Gill Case: पृथ्वी शॉला मुंबई कोर्टाचा दणका; विनयभंग प्रकरणात ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT