ICC issues strong warning to Bangladesh Cricket Board over T20 World Cup participation. saam tv
Sports

T20 World Cup: भारतात या! नाहीतर वर्ल्ड कप विसरा; ICCची वॉर्निंग, बांगलादेशला हट्टीपणा पडला महागात

T20 World Cup Row: आयसीसीने बांगलादेशला भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळण्याचा इशारा दिला आहे. भारतात क्रिकेट सामने खेळा नाहीतर स्पर्धेतून वगळण्यात येईल असा इशारा आयसीसीने दिलाय.

Bharat Jadhav

  • भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यास बांगलादेश बाहेर

  • आयसीसीकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पष्ट इशारा

  • निर्णय बदलण्यासाठी एक दिवसाची मुदत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने बांगलादेशची टी-२० विश्वचषक सामने भारताऐवजी दुसऱ्या देशात खेळवण्याची मागणी फेटाळून लावलीय. जर बांगलादेशने टी-२० विश्वचषकात आपले सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला तर, बांगलादेश ऐवजी दुसऱ्या देशाच्या संघाला टूर्नामेंटमध्ये घेतलं जाईल, असं तेथील क्रिकेट बोर्टाने बांगलादेशच्या सरकारला कळवावं, असं आयसीसीनं बुधवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगितलंय.

दरम्यान ICC बांदेलदेशाला आखणी एका दिवशाची अवधी दिलाय. बांगलादेश भारतात न खेळण्याच्या निर्णयाबाबत एक दिवस अजून विचार करावा,असेही आयसीसीनं सांगितलंय. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बुधवारी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत बांगलादेशच्या सहभागावर चर्चा झाली. यात बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदस्यांनी बांगलादेशला वगळण्यात यावे असं सांगितलं.

जर बांगलादेश संघाला भारतात खेळायचे असेल तर ते स्पर्धेत राहू शकतात, अन्यथा त्यांच्या जागी दुसऱ्या संघाचा विश्वचषकात समावेश केला जाईल. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाला निर्णय घेण्यास आखणी एका दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय ICC बोर्डाने घेतलाय. जर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २० संघांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाठवला नाही, तर सध्याच्या क्रमवारीच्या आधारे स्कॉटलंडला मैदानात उतरवले जाऊ शकतं.

जर बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात आपले सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला, तर त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला संधी देण्यात येईल, अशी माहिती संघाच्या व्यवस्थापन मंडळाने बांगलादेश सरकारला द्यावी असं आयसीसीने म्हटलंय. आयसीसीच्या या निर्णयानंतर मतदान घेण्यात आले, यात आयसीसी बोर्डाच्या बहुसंख्य सदस्यांनी संघ बदल करण्यात यावा या बाजूने मतदान केले. दरम्यान भारतात खेळण्याबाबत आयसीसीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्यासाठी बीसीबीला आणखी एक दिवस देण्यात आलाय.

वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआयच्या निर्देशांनंतर बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात संघ पाठवण्यास नकार दिलाय. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध दुरावले आहेत. दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळण्यास इच्छित आहे. बीसीबीने वारंवार आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत बांगलादेशी बोर्डाने एक विचित्र प्रस्तावही मांडला.

त्यांनी बांगलादेशला गट क मधून काढून गट ब मध्ये पाठवावे. आयर्लंडला त्यांचे स्थान द्यावे, अशी मागणी केली. कारण आयर्लंडला त्यांचे सर्व गट स्टेज सामने श्रीलंकेत खेळायचे आहे. दरम्यान बांगलादेशाची ही विनंती आयसीसीनं फेटाळून लावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT