Sports

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

Team India’s 72-Run Victory : चेन्नई येथे झालेल्या सुपर-८ सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी मोठा विजय मिळवला. मोठा विजय मिळवूनही, भारताचा नेट रन रेट नकारात्मक आहे

Bharat Jadhav

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीतील सामन्यात भारताने दमदार विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला बाद फेरीत पोहोचवलंय. सुपर ८ चे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिका +२.८९० च्या नेट रन रेटसह ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर आहे.

या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेला विजयासाठी २५७ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांना ६ गडी बाद १८४ धावाच करता आल्या. भारतीय संघाला आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजला हरवावे लागेल. भारत-वेस्ट इंडिज सामना १ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. दरम्यान झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला.

इशान किशन, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने चांगली सुरुवात केली पण खूपच संथ राहिली. ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमानी यांनी ६.२ षटकांत ४४ धावा जोडल्या. अक्षर पटेलने मारुमानी (२० धावा) ला बाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने डायन मायर्सला फक्त ६ धावांवर बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणाव वाढणार?

SCROLL FOR NEXT