T20 World Cup, IND vs PAK Final Saam
Sports

T20 World Cup: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? 'या' एका समीकरणामुळे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

IND vs PAK final : भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात विश्वचषकाची फायनल होण्याची शक्यता वाढली आहे. उपांत्य फेरीसाठीचे समीकरण आणि दोन्ही संघांचा संभाव्य मार्ग नेमका काय आहे?

Namdeo Kumbhar

T20 World Cup, IND vs PAK Final : टी२० विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे पोहचला आहे. सुपर ८ फेरीतील अखेरचे २ सामने बाकी आहेत अन् उपांत्य फेरीसाठी २ संघही ठरणार आहेत. टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या कट्ट्रर प्रतिस्पर्धींचा पुन्हा एकदा सामना होऊ शकतो. हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना होणार असल्याची चर्चा एका समीकरणामुळे सुरू झाली आहे. (India vs Pakistan T20 World Cup final qualification scenario)

२०२६ विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही संघातील ब्लॉकबस्टर सामन्यासाठी चाहते सज्ज होऊ शकतात. कारण ही शक्यता एका समि‍करणावर तयार झालेली आहे. ग्रुप अ मधून दक्षिण आफ्रिका आणि ग्रुप ब मधून इंग्लंड या संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. आता भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यापैकी २ संघ उपांत्य फेरीचे तिकिट मिळवतील.

पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार का?

शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीचं तिकिट मिळवले. इंग्लंडविरोधातील पराभानंतर आता न्यूझीलंड ३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यापैकी कोणता संघ उपांत्य फेरीत जाणार, याचा निर्णय श्रीलंका संघाच्या कामगिरीवर ठरणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तानला श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करावा लागेल अथवा दिलेले टार्गेट १३.१ षटकात पूर्ण करावे लागेल.

भारतापुढे विंडिजचे आव्हान -

गतविजेत्या भारतीय संघाला सुपर ८ मध्ये पहिल्या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने दुसऱ्या सामन्यात झिम्बाव्बेचा ७२ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. सुपर ८ मधील अ गटातून आफ्रिका संघाने उपांत्य फेरीतील तिकिट निश्चित केलेय. रविवारी होणाऱ्या सामन्यानंतरच या गटातील दुसरा संघ निश्चित होणार आहे. वेस्ट इंडिज आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी विजय गरजेचाच आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी विडिंजचा पराभव करावाच लागेल. पण जर पावसाने सामना रद्द झाला तर विडिंजचा प्रवेश निश्चित मानला जातोय.

भारत-पाकिस्तान पुन्हा फायनलमध्ये आमनेसामने? नेमकं समीकरण काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टी२० विश्वचषकात अंतिम सामना होणं शक्य आहे, पण त्यासाठी दोन्ही संघाला आधी उपांत्य फेरीत प्रवेश करावा लागेल. विडिंजचा पराभव केल्यास भारत उपांत्य फेरीत इंग्लंडविरोधात मैदानात उतरले. तर पाकिस्तानने नेट रनरेट राखत श्रीलंकेला हरवले तर आफ्रिकासोबत त्यांची लढत होईल. उपांत्य सामन्यात भारत-पाकिस्तान यांनी आपापले सामने जिंकले तर अंतिम फेरीत दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आमनासामना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : यवतमाळमध्ये अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचा मृत्यू

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Soaked pomegranate: डाळिंबाचे दाणे १५ मिनिटं कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल? हा उपाय वाचून थक्क व्हाल

Cancer : गॅसमुळे पोट फुगतंय समजून दुर्लक्ष करून का, 'या' प्रकारच्या कॅन्सरची असू शकतात 'ही' ६ लक्षणे

SCROLL FOR NEXT