Nandurbar Development : सातपुड्यात विकासाचा नवा अध्याय, धडगाव-तळोदा बोगदा ५ किमीचा होणार, वेळ वाचणार

Satpura tunnel project : सातपुड्यातील धडगाव-तळोदा प्रस्तावित ५ किमी बोगद्यामुळे अंतर ११ किमीने कमी होणार असून नंदुरबारच्या दुर्गम भागाला सुरक्षित व जलद जोडणी मिळणार आहे. अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता.
Dhadgaon Taloda tunnel distance reduction details
Dhadgaon Taloda tunnel distance reduction details Saam TV Marathi
Published On

Dhadgaon Taloda tunnel distance reduction details : नंदुरबारच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांतून आता विकासाचा नवा मार्ग मोकळा होणार आहे. धडगाव-तळोदा बोगद्याच्या सर्वेक्षणाला राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे. 5 मार्चच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद होण्याची चिन्हे आहेत.

धडगाव-तळोदा बोगद्याला गती मिळाल्यामुळे सातपुड्यात रस्ते विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ४४ किमीचा प्रवास आता ३३ किमीवर येणार आहे. बोगद्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. ​चांदसैली घाटाच्या जीवघेण्या प्रवासातून आता सुटका होणार आहे. नव्या बोगद्याचे सर्वेक्षण लवकरच मिळणार आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. या घाटात आता पर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Dhadgaon Taloda tunnel distance reduction details
Pakistan Air Strike : पाकिस्तानवर दिवसाढवळ्या एअरस्ट्राइक; अफगाणिस्तानचा लष्कराच्या तळावर हल्ला, बराकी केल्या उद्ध्वस्त

सातपुड्यातील दुर्गम भागातील धडगाव शहराला जिल्हा मुख्यालयाशी जोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोगद्याची मागणी केली जात होती. आता या मागणीला मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभेत केलेल्या पाठपुराव्याला यश येताना दिसत असून, आगामी अर्थसंकल्पात या बोगद्याच्या क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

Dhadgaon Taloda tunnel distance reduction details
Rajya Sabha : उमेदवार जवळपास निश्चित, ३ नेते होणार खासदार, वाचा महायुतीनं कुणाला दिली संधी?

सातपुड्यातील तळोदा.ते धडगाव थेट 11 किलोमीटरने अंतर कमी होणार असून सध्याचे अंतर 44 किमी चांदसैली घाटामार्गे केवळ 33 किमी होणार आहे. सध्याचा चांदसैली घाट हा पावसाळ्यात दरडी कोसळत असल्याने अत्यंत धोकादायक ठरतो. याला कायमस्वरूपी पर्याय म्हणून 4 ते 5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षणासाठी राज्य शासनाकडे हमीपत्र पाठवले असून, डोंगरांचे तांत्रिक परीक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या बोगद्यामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत धडगावमधील रुग्णांना तळोदा किंवा नंदुरबारला पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

Dhadgaon Taloda tunnel distance reduction details
Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com