Rohit sharma and babar azam saam tv
Sports

T20 World Cup: भारत-पाकिस्तान फायनलची स्क्रिप्ट रेडी...मेलबर्नमध्ये १५ वर्षांचा दुष्काळ संपणार

पाकिस्ताननं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत फायनलमध्ये प्रवेश केलाय.

Nandkumar Joshi

India Vs Pakistan Final : टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झाला. स्टेडिअममध्ये ९० हजारांहून अधिक प्रेक्षक होते. त्यावेळचं वातावरण भारावलेलं होतं. मैदानात या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांनी जो खेळ दाखवला, त्यामुळं वातावरणही तसंच झालं. त्यानंतर १३ नोव्हेंबरलाही एमसीजीवर फायनल होईल, तेव्हा असंच वातावरण बघायला मिळेल, असं सगळ्यांना वाटतंय. पण त्यासाठी हे दोन संघ टी २० वर्ल्डकपच्या (T20 world cup) फायनलमध्ये पोहोचणे गरजेचे आहे.

कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांची एक बाजू पूर्ण झालेली दिसतेय. पाकिस्ताननं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती भारतीय संघाची. त्याचा फैसला आता १० नोव्हेंबरला एडलेडमध्ये होईल. (T20 World Cup Can be India Vs Pakistan Final)

ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधी पाकिस्तान संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. तसं असंख्य क्रिकेट समीक्षकांना वाटत होतं. पण संघातील खेळाडूंच्या निवडीवरून पाकिस्तानमध्येच प्रचंड नाराजी आणि शंका होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्यानंतर सर्वात मोठा झटका हा झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या पराभवानं मिळाला होता.

पाकिस्तान फायनलमध्ये, आता टीम इंडियाची प्रतीक्षा

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानी संघानं जोरदार कमबॅक केलं. लागोपाठ चार सामने जिंकून पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला आहे. टी २० वर्ल्डकपचा अंतिम सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. आता लाखो, कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय ते इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याकडे. इंग्लंडला पराभूत करून भारत फायनलमध्ये धडकेल आणि पुन्हा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना बघायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

१५ वर्षांनंतर पुन्हा फायनल?

भारत -पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना बघणं फक्त दोन देशांच्या चाहत्यांसाठीच नाही तर, अवघ्या जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. अवघ्या क्रिकेट विश्वाचं या लढतीकडं लक्ष असतं. १५ वर्षांपूर्वी २००७ मध्ये टी २० वर्ल्डकपमध्ये हा थरार बघायला मिळाला होता. जोहान्सबर्गमध्ये तेव्हा भारतानं पाकिस्तानला रोमहर्षक लढतीत पराभूत केलं होतं. आता १५ वर्षांनंतर पुन्हा फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT