team india win against pakistan  saam tv
Sports

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

team india win against pakistan : टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात सलग ८ वा विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला लोळवलं

पाकिस्तानचा संघ 117 धावांवर बाद

भारताने पाकिस्तानविरुद्ध नोंदवला सलग 8 वा विजय

टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या २७ वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला १७६ धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ११७ धावांवर गारद झाला. या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात सलग ८ वा विजय मिळवला आहे.

भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान आणि सॅम अयूब मैदानात उतरले. परंतु हार्दिक पंड्याने फरहानला शून्यावर बाद केले. हार्दिकने पहिलं षटक मेडन टाकलं. त्यानंतर बुमराहने कमान सांभाळली. दुसऱ्या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूत अयुबला बाद केले. अयुब अवघ्या ६ धावांवर बाद झाला. याच षटकात बुमराहने कर्णधार सलमानलाही बाद केले.

पाकिस्तानचे १३ धावांवर ३ गडी बाद झाले होते. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले. पाचव्या षटकात अक्षर पटेलने बाबर आझमला क्लीनबोल्ड केले. बाबरने फक्त ५ धावा कुटल्या. त्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या ६ षटकात फक्त ४ गडी बाद ३८ झाली होती. त्यानंतर उस्मान खान आणि शादाब खानने डाव सावरला.

उस्मान आणि शादाबने ३९ धावांची भागीदारी रचली. दोघांची जोडी अक्षर पटेलने तोडली. अक्षरने ११ व्या षटकात उस्मानला बाद केले. उस्मानला ३४ व्या चेंडूत ४४ धावा कुटल्या. त्यानंतर कुलदीपने १२ व्या षटकात मोहम्मद नवाजला बाद केले. नवाज अवघ्या ४ धावांवर बाद झाला. १६ व्या षटकात पाकिस्तानला ८ वा धक्का बसला. फहीम १० धावा करून बाद झाला. त्यानतंर पुढील चेंडूवर वरुणने अबरारला बाद केले. त्यानंतर शेवटचा गडी हार्दिक पंड्याने घेतला. पाकिस्तानचा संघ अवघ्या ११४ धावांवर गारद झाला. या विजयाने टीम इंडियाचं सुपर-८ मध्ये स्थान निश्चित केलं आहे.

ईशान किशन चमकला

टी२० वर्ल्डकपच्या इतिहासात आजच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानविरुद्ध ईशान किशनची बॅट चांगलीच तळपळली. ईशान किशनने ७७ धावांची आक्रमक खेळी खेळली. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावा कुटल्या. तिलक वर्माने २५ धावा कुटल्या. अभिषेक शर्मा शून्य धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात शिवम दुबे २७ धावा करून बाद झाला. तर अक्षर पटेल देखील झेलबाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

SCROLL FOR NEXT