ICC Women’s T20 World Cup 2026  Saamtv
Sports

T20 World Cup 2026 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; भारतीय संघाचे कधी होतील सामने, जाणून घ्या शेड्युल्ड

ICC Women’s T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या संपूर्ण सामन्यांची यादी जाहीर झाली आहे. यजमान इंग्लंडचा पहिला सामना १२ जून रोजी एजबॅस्टन येथे श्रीलंकेविरुद्ध होईल.

Bharat Jadhav

भारत-पाकिस्तान क्रिकेट स्टेडियमवर भिडणार आहेत. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. क्रिकेट स्पर्धा म्हटलं म्हणजे क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तानच्या सामन्याची मोठी उत्सुकता असते. दोन्ही देशांचे सामने पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट रसिक खूप उत्सुक असतात. (ICC Women’s T20 World Cup 2026 Scheduled)

पुढील वर्षाच्या जून-जुलै महिन्यात आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असून ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा असणार आहे. यात १२ संघांचा समावेश असणार आहे. सामन्यांसोबतच लीग टप्प्यातील गटांची घोषणाही करण्यात आलीय.

गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया , तसेच २०२४ च्या अंतिम फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान, याचबरोबर जागतिक पात्रता फेरीतील दोन संघांचा समावेश आहे. तर गट-२ मध्ये यजमान इंग्लंड, गतविजेता न्यूझीलंड, श्रीलंका, माजी विजेता वेस्ट इंडिज आणि ग्लोबल क्वालिफायरमधील इतर दोन संघांचा या गटात समावेश आहे.

ही स्पर्धा एक मोठी असून तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी असणार आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेमुळे देशभरातील चाहत्यांना जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंना खेळताना पाहण्याची संधी मिळेल, शिवाय देशभरातील असंख्य महिला आणि मुलींना क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा या स्पर्धेतून मिळेल.

स्पर्धेच्या संचालिका बेथ बॅरेट-वाइल्ड म्हणाल्या की, ही स्पर्धा कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यास हातभार लावेल. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक महिला क्रिकेटबद्दलचा दृष्टीकोन बदलणार ठरेल, असंही त्या म्हणाल्या.

अशी असेल स्पर्धा

प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. हे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी 'द ओव्हल' येथे होतील. तर अंतिम फेरी ५ जुलै रोजी लॉर्ड्स येथे होईल. ही स्पर्धा २४ दिवस सुरू राहील. यात एजबॅस्टन, हॅम्पशायर बाउल, हेडिंग्ले, ओल्ड ट्रॅफर्ड, द ओव्हल, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड आणि लॉर्ड्स या ७ प्रतिष्ठित ठिकाणी ३३ सामने खेळवले जाणार आहेत.

वेळापत्रक

१२ जून - इंग्लंड वि. श्रीलंका, एडबस्टन

१३ जून - वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड, हॅम्पशायर बॉल

- क्वालिफायर वि. क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड

- ऑस्ट्रेलिया वि.दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड

१४ जून - क्वालिफायर वि. क्वालिफायर, एडबस्टन

- भारत वि. पाकिस्तान, एडबस्टन

१६ जून - न्यूझीलंड वि. श्रीलंका, हॅम्पशायर

- इंग्लंड वि. क्वालिफायर, हॅम्पशायर

१७ जून - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर, हेडिंग्ली

- भारत वि. क्वालिफायर, हेडिंग्ली

- दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान, एडबस्टन

१८ जून - वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर, हेडिंग्ली

१९ जून - न्यूझीलंड वि. क्वालिफायर, हॅम्पशायर

२० जून - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर,हॅम्पशायर

- पाकिस्तान वि. क्वालिफायर, हॅम्पाशायर

- इंग्लंड वि. क्वालिफायर, हेडिंग्ली

२१ जून - दक्षिण आफ्रिका वि. भारत, ओल्ड ट्रॅफर्ड

- वेस्ट इंडिज वि. श्रीलंका, ब्रिस्टॉल कौंटी

२३ जून - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, हेडिंग्ली

- न्यूझीलंड वि. क्वालिफायर, ब्रिस्टॉल कौंटी

- श्रीलंका वि. क्वालिफायर, ब्रिस्टॉल कौंटी

२४ जून - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, लॉर्ड्स

२५ जून - भारत वि. क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड

- दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर, ब्रिस्टॉल कौंटी

२६ जून - श्रीलंका वि. क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड

२७ जून - पाकिस्तान वि. क्वालिफायर, ब्रिस्टॉल कौंटी

- वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर, ब्रिस्टॉल कौंटी

- इंग्लंड वि. न्यूझीलंड, दी ओव्हल

२८ जून - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर, लॉर्ड्स

- ऑस्ट्रेलिया वि. भारत, लॉर्ड्स

३० जून - पहिली उपांत्य फेरी

२ जुलै - दुसरी उपांत्य फेरी

५ जुलै -अंतिम सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

SCROLL FOR NEXT