T20 World Cup 2024, Team India
T20 World Cup 2024, Team India  SAAM TV
क्रीडा | IPL

T20 वर्ल्डकपमध्ये मोठा बदल, २० संघ, पात्रता फेरीही नाही; असा असेल नवा फॉरमॅट

Nandkumar Joshi

T20 World Cup 2024 : टी २० वर्ल्डकप २०२२ चे विजेतेपद इंग्लंडने पटकावले. १६ संघांमधून क्रिकेट जगताला टी २० मधील सर्वोत्तम संघ मिळाला. मात्र, आता टी २० वर्ल्डकपच्या फॉरमॅटमध्येच मोठा बदल झाला आहे.

आगामी म्हणजेच २०२४ च्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत १६ संघ नाही तर तब्बल २० संघांमध्ये टक्कर होणार आहे. २०२४ मध्ये वर्ल्डकप स्पर्धा यूएसए आणि वेस्टइंडीजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत मोठा बदल झालेला आहे. पुढील मोसमात २० संघ खेळतील. इतकेच नाही तर, या मोसमात पात्रता फेरी खेळवली जाणार नाही. यूएसएमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा महामेळा भरवण्यात आला आहे. (Cricket News)

विशेष म्हणजे, यजमान युएसए आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ थेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रवेश करतील. २० संघ असलेली स्पर्धा नॉकआउटआधी दोन टप्प्यात खेळवली जाईल. मात्र हे दोन्ही टप्पे २०२१ आणि २०२२ मध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या फेरीपेक्षा किंवा सुपर १२ पेक्षा नक्कीच वेगळे असतील.

सर्व संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच पाच संघ असतील. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करतील. सर्व संघांना ४-४ मधून २ गटांत विभागले जाईल. दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सेमिफायनलमध्ये प्रवेश करतील. (Sports News)

संघ पात्रता फेरी कशी गाठतील?

टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी दोन संघांचे स्थान आधीच निश्चित करण्यात आले आहे. वेस्टइंडीज आणि यूएसए हे दोन संघ असतील. त्यानंतर २०२२ वर्ल्डकपमधील कामगिरी आणि १४ नोव्हेंबरपर्यंत आयसीसी टी २० रँकिंगच्या आधारावर पुढील १० संघ निश्चित केले जातील. म्हणजेच १० संघांचे स्थान आधीच निश्चित होणार आहे.

पात्रता फेरीतलं गणित

वेस्ट इंडीज - यजमान

अमेरिका - यजमान

इंग्लंड - टी २० वर्ल्डकप विजेते

पाकिस्तान - टी २० वर्ल्डकप रनरअप

न्यूझीलंड - टी २० वर्ल्डकप २०२२ सेमिफायनलिस्ट

भारत - टी २० वर्ल्डकप २०२२ सेमिफायनलिस्ट

ऑस्ट्रेलिया - टी २० वर्ल्डकप २०२२ - अव्वल आठमधील

नेदरलँड्स - टी २० वर्ल्डकप २०२२ - अव्वल आठमधील

दक्षिण आफ्रिका - टी २० वर्ल्डकप २०२२ - अव्वल आठमधील

श्रीलंका - टी २० वर्ल्डकप २०२२ - अव्वल आठमधील

अफगाणिस्तान - १४ नोव्हेंबरपर्यंत टी २० रँकिंगमध्ये पुढील सर्वोत्तम

बांगलादेश - १४ नोव्हेंबरपर्यंत टी २० रँकिंगमध्ये पुढील सर्वोत्तम

प्रादेशिक पात्रता फेरीतून आठ संघांचा होणार फैसला

याशिवाय टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये उर्वरित आठ संघांचा फैसला हा प्रादेशिक पात्रतेच्या आधारे करण्यात येईल. आफ्रिका, आशिया आणि युरोपकडे प्रत्येकी दोन क्वालिफिकेशन स्पॉट आहेत. तर अमेरिका आणि पूर्व आशिया-प्रशांत यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहे. प्रादेशिक पात्रता फेरीत विजेते ठरलेले संघ भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान यांसारख्या संघांच्या गटात असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Share Market जगात पुन्हा हर्षद मेहता घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार?

Relationship Tips: लग्न ठरवण्यापुर्वी जोडीदाराला अवरजून विचारा 'हे' प्रश्न

SRH vs LSG,Weather Update: हैदराबाद- लखनऊ सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Today's Marathi News Live : नंदुरबारमधील प्रियंका गांधी यांची सभा रद्द

Crime News: मॅट्रिमोनिअल साइट्सवर ओळख; ७ महिलांशी लग्न आणि तिघींवर अत्याचार, शिक्षिकेमुळे पितळ उघडं पडलं

SCROLL FOR NEXT