T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match All Details:  Saamtv
Sports

India Vs Pakistan Match: भारत- पाकिस्तान सामन्यात पाऊस 'खेळ' बिघडवणार! मैदानाची साथ कोणाला? असं असेल हवामान; वाचा सविस्तर

T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match All Details: टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. मात्र या लक्षवेधी लढतीत पाऊस खेळ बिघडवण्याची शक्यता आहे. कसं असेल आजचे हवामान अन् खेळपट्टी? वाचा.....

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. २०२१ चा एकमेव पराभव वगळता भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तानला धुळ चारली आहे. जगभरातील क्रिडाप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले असून न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. परंतु भारत पाकिस्तानच्या या सामन्यात पाऊस खेळ बिघडवण्याची शक्यता आहे. कसे असेल हवामान अन् खेळपट्टी? जाणून घ्या सविस्तर.

कशी असेल खेळपट्टी?

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम चर्चेत असण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील खेळपट्टी ज्याने फलंदाजांना चकित केले आहे आणि गोलंदाजांना दिलासा मिळाला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये असे दृश्य सामान्यपणे पाहण्याची चाहत्यांना फारशी सवय नसते. आत्तापर्यंत या खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली आहे.

न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर पहिला डाव असो वा दुसरा डाव, येथे आतापर्यंत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज यांचा भेदक मारा निर्णायक ठरु शकतो. तसेच मोहम्मद आमिर, शाहीन आफ्रिदी हे पाकिस्तानचे गोलंदाजही भेदक मारा करु शकतात.

कसे असेल हवामान?

भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या लक्षवेधी लढतीत पाऊस खेळ बिघडवण्याची शक्यता आहे. 9 जून रोजी नासाऊ काउंटीमध्ये सकाळी हवामान चांगले राहणार नाही आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान अंदाजानुसार, नासो काउंटीमध्ये सकाळच्या सुमारास पावसाची सुमारे 61 टक्के शक्यता आहे. आता भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळेल पण अमेरिकेत हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 पासून सुरू होईल. अशा स्थितीत सकाळी पाऊस झाल्यास सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT