टी ट्वेंटी विश्वचषकात आज बलाढ्य भारतीय संघ आणि पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. न्यूयॉर्कमधील नसाउ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. क्रिकेटच्या मैदानातील सर्वात हायहोल्टेज लढतींकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आज भारत पाकिस्तान लढत!
देशभरासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असते ती भारत- पाकिस्तान सामन्याची. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओखळले जाणारे हे दोन संघ आज आमने- सामने येणार आहेत. एकीकडे बलाढ्य भारतीय संघ समोर असताना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला आजचा सामना जिंकावा लागणार आहे.
कसा पाहाल सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. त्याच वेळी, अमेरिकन वेळेनुसार, सकाळी 10.30 पासून हा सामना खेळला जाईल. . भारतीय क्रिडा प्रेमींना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि टॅबलेट वापरकर्ते डिस्ने हॉटस्टार ॲपवर लाइव्ह सामना पाहता येईल.
कोणाचे पारडे जड?
T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान 7 वेळा आमनेसामने आले आहेत. पहिल्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ २ वेळा आमने सामने आले आणि टीम इंडियाने अंतिम फेरीसह दोन्ही सामने जिंकले. यानंतर भारताने पुढील 5 पैकी 4 सामने जिंकले. म्हणजे टीम इंडियाने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 2021 मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, हा कोणत्याही विश्वचषकात टीम इंडियाविरुद्धचा एकमेव विजय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.