T20 World Cup 2024 Match Saam tv
Sports

T20 World Cup 2024: डी कॉकची झंजावाती खेळी, दक्षिण आफ्रिकेचं यूएसएसमोर १९५ धावांचं लक्ष्य

USA VS South Africa ICC t20 World Cup Match 2024 news: दक्षिण आफ्रिकेने यूएसएला १९५ धावांचं आव्हान दिलं. सामन्याच्या पहिल्या डावात डी कॉकने झंझावती खेळी खेळली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत यूएसए आणि दक्षिण आफ्रिकेत सामना सुरु आहे. आतापर्यंत या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने एकही सामना गमावला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएसएला १९५ धावांचं आव्हान दिलं. या डावात डी कॉकने झंझावती अर्धशतकी खेळी खेळली.

स्पर्धेत पाचवा विजय मिळवण्याचा निश्चय करत प्रथम फलंदाजीसाठी उतरेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. यूएसएच्या सौरभ नेत्रावलकरने पहिल्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. तर यूएसएला दुसरं अली खानचं षटक महागात पडलं. दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेने १० धावा कुटल्या. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या सौरभने नेत्रावलकरने हेंड्रिक्सला तंबूत पाठवलं. हेंड्रिक्स रुपात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला.

पहिल्या धक्का बसल्यानंतर खेळपट्टीवरील एडन मारक्रम आणि डी कॉकने झुंजार खेळी सुरु केली. चौथ्या षटकात डिकॉकने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये डी कॉकने अर्धशतकी खेळी खेळली. अवघ्या २६ चेंडूत डिकॉकने अर्धशतक पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिकेने १० षटकात १०० हून अधिक धावा केल्या. डी कॉकने मार्करमच्या साथीने १० षटकात आक्रमक खेळी खेळली. पुढे हरमीत सिंहने दक्षिण आफ्रिलेला दुसरा धक्का दिला. डी कॉकने ४० चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ७४ धावा ठोकल्या. १२ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला.

हरमीत सिंहने डी कॉकला बाद केले. त्यानंतर १४ व्या षटकात सौरभने मार्करमला बाद केले. तर १६ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेने १५० धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेची २०० धावांकडे वाटचाल सुरु होती. मात्र, यूएसएच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला १९४ धावांवर रोखलं. त्यामुळे अमेरिकेला जिंकण्यासाठी १९५ धावा कराव्या लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT